बिपरजॉय चक्रीवादळाबाबत (Cyclone Biperjoy) आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. हे चक्रीवादळ अत्यंत तीव्र झाले असून ते गुजारतकडे सरकत आहे. त्यामुळे गुजरातमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अरबी समुद्रातून येणारे हे वादळ गुजरातमध्ये धडकण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. म्हणून गुजरातने 30,000 लोकांना सुरक्षित स्थळी पाठवलं आहे.
मोठी दुर्घटना! बोट उलटली अन् १०० लोकांचा बुडून मृत्यू, अनेक जण बेपत्ता
यासाठी नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) आणि स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (SDRF) च्या अनेक टीम तयार आहेत. यासोबतच लष्कराच्या अधिकाऱ्यांनी नागरी प्रशासन आणि एनडीआरएफसोबत संयुक्तपणे मदतकार्याचे नियोजन केले आहे. लष्कराने मोक्याच्या ठिकाणी पूर मदत पथके सज्ज ठेवली आहेत.
Ajit Pawar । अजित पवार यांचा मोठा दावा; म्हणाले, “मला शिंदे गटाच्या काही खासदारांनी…”
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तेथील गोष्टींचा आढावा घेण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरात सरकारला असुरक्षित ठिकाणी राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची आणि वीज, दूरसंचार, आरोग्य यासारख्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यास सांगितले आहे.
Video | उर्फी जावेदचा ‘तो’ व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले; म्हणाले, “तुला काही…”
हे ही पाहा