राज्यात एकीकडे चिंचवड व कसबा विधानसभेच्या निकालाची चर्चा सुरु आहे, तर दुसरीकडे नागालँड मधील विधानसभा निवडणुकांचा निकाल समोर आला आहे. दरम्यान, नागालँडमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ५ विधानसभा मतदार संघात आघाडी मिळवली असून २ मतदार संघात विजय मिळवलाय.
त्याचबरोबर महत्त्वाची बाब म्हणजे या निवडणुकीत पहिल्यांदाच रामदास आठवले ( Ramdas Aathvle) यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने ( RPI) विजयाचा गुलाल उधळला आहे.
रामदास आठवलेंच्या पार्टीचा नागालँड मध्ये डंका; विधानसभा निवडणुकीत मिळवला दोन जागांवर विजय
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे दोन उमेदवार नागालँडमध्ये चांगल्या मतांनी विजयी झाले आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन महिला उमेदवारांनी महाराष्ट्राच्या बाहेर विजय मिळवला असल्याने पक्षात आनंदाचे वातावरण आहे.