Site icon e लोकहित | Marathi News

Jayakwadi Dam Water Level । मोठी बातमी! जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत तब्ब्ल १० टक्क्यांनी वाढ

Jayakwadi dam water Level

Jayakwadi Dam Water Level । गेल्या 48 तासापासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. नाशिकमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. सतत पडणाऱ्या या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. गंगापूर आणि इतर धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे. यामुळे मराठवाड्याला मोठा दिलासा मिळाला आहे.

Poco M6 Plus 5G ते Phone 2A Plus पर्यंत, या 5 शक्तिशाली स्मार्टफोन्सची विक्री पुढील आठवड्यात सुरू; पाहा तारीख

पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, मागच्या दोन आठवड्यात जायकवाडी धरणात तब्बल दहा टक्के पाणी जमा झालाले आहे. त्यामुळे आता धरणातील एकूण पाणीसाठा 14 टक्क्यांवर पोहोचलाय. नाशिक जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून सतत पाऊस सुरू आहे. यामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे.

Accident News । नाशिकमध्ये भीषण अपघात, बस-कारच्या धडकेत दोन जण जिवंत जाळले

नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणातून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढल्याने जायकवाडी धरणात पाणीसाठा वाढण्याची शक्यता आहे. सध्या नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे, ओझरवेर, गंगापूर, पालखेड, भावली कडव, नागमठाण, नांदूर मध्यमेश्वर, भंडारदरा हीहे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळेच जायकवाडी धरणामध्ये सध्या पाण्याची आवक वाढली आहे.

Pune News । खळबळजनक! पुणे जिल्ह्यात दुकानदाराची कोयत्याने निर्घृण हत्या

Spread the love
Exit mobile version