
भारताची स्टार खेळाडू सानिया मिर्झा हिने नुकतीच टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली. दरम्यान आणखी एका प्रसिद्ध खेळाडूने निवृत्ती घेतली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू मुरली विजयने ( Murli Vijay) सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा म्हंटले आहे. कसोटी संघाचा सलामीवीर फलंदाज अशी त्याची विशेष ओळख आहे.
सुषमा अंधारे ‘स्टूलवाली बाई’! ‘या’ बड्या नेत्याने केली जोरदार टीका
सुमारे 5 वर्षांपूर्वी विजयने भारतीय संघासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर विजयला संघात स्थान मिळवण्यात सातत्याने अपयश येत होते. यामुळे त्याने निवृत्ती ( Retirment) जाहीर करत अखेर क्रिकेटला अलविदा केले आहे. 2008 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
धक्कदायक! पाकिस्तानमध्ये नमाजादरम्यान मशिदीत बॉम्बस्फोट; अनेकजण गंभीर जखमी
मुरली विजय आतापर्यंत भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. सध्या तो 38 वर्षाचा असून निवृत्ती जाहीर करताना त्याने ट्विट केले आहे. यामध्ये त्याने लिहिले आहे की, “आज मी कृतज्ञतापूर्वक आणि नम्रतेने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून माझी निवृत्ती जाहीर करतो. 2002 ते 2018 हा माझा प्रवास असून या खेळाच्या सर्वोच्च स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणे हा एक सन्मान होता.”
बिग ब्रेकिंग! बलात्कार प्रकरणात आसाराम बापू दोषी, उद्या शिक्षा सुनावली जाणार
मला क्रिकेट खेळण्यासाठी संधी दिल्याबद्दल मी बीसीसीआय, तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन, चेन्नई सुपर किंग्ज यांचा आभारी आहे. तसेच माझे सर्व सहकारी, प्रशिक्षक मार्गदर्शक आणि सपोर्ट स्टाफ, तुम्हा सर्वांसोबत खेळणे ही एक मोठी गोष्ट होती आणि मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. असे म्हणत मुरली विजयने सर्वांचे आभार मानले आहे.
पाण्यावर अचानक जोरात धावू लागला कुत्रा, कुत्र्याचा स्टंट पाहणारी मंडळी कोमात; पाहा VIDEO
दरम्यान त्याने त्याच्या पुढच्या प्रवासाबद्दल देखील सांगितले आहे. अगामी काळात आपण क्रिकेट जगतामध्ये व त्या संबंधीत व्यवसायात नवीन संधी शोधत असल्याने तो ट्विटमध्ये म्हणाला आहे. तसेच आयुष्याच्या पुढच्या नवीन अध्यायाची आपण वाट पाहत आहोत. असे तो म्हणाला आहे.