भारताची स्टार टेनिसपटू म्हणून सानिया मिर्झाला ओळखले जाते. टेनिस खेळून भारताचे नाव जगभरात मोठे करणाऱ्या सानिया मिर्झाने ( Saniya Mirza) एक मोठा निर्णय घेतला आहे. सानियाने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत प्रोफेशनल टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन करणाऱ्या उर्फी जावेदला मुंबई पोलिसांकडून नोटीस; आज होणार चौकशी
ऑस्ट्रेलिया ओपन ( Aistrelian Open) स्पर्धेनंतर आपल्या मुलासोबत अधिक वेळ घालवायचा असल्याचे सांगत, सानिया मिर्झाने आपला निर्णय जाहीर केला आहे. यामध्ये सानिया मिर्झाने तिच्या मुलाला सध्या तिची जास्त गरज असल्याचे सांगितले आहे. या सोशल मीडिया पोस्टमध्ये सानियाने तिचा आतापर्यंतचा प्रवास मांडला आहे.
पुण्यामध्ये एकाच कुटुंबातील चार जणांची विष प्राशन करून आत्महत्या
अवघ्या सहा वर्षाची असल्यापासून तिने टेनिस ( Tennis) खेळायला सुरुवात केली होती. आता 30 वर्षांच्या टेनिसमधील करिअर नंतर सानिया निवृत्ती घेत आहे. तिच्या आतापर्यंतच्या प्रवासात साथ दिलेल्या सर्वांचे तिने यावेळी आभार मानले आहेत. या पोस्टसोबत सानियाने तिचे अनेक फोटो देखील जोडले आहेत.
सानियाने तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत दुहेरीत तीन वेळा चॅम्पियन ठरली आहे. तर 2016 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचे महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते. याशिवाय सानिया मिर्झाने महिला दुहेरीत 2015 मध्ये विम्बल्डन आणि यूएस ओपनचे विजेतेपद सुद्धा पटकावले होते. ऑस्ट्रेलियन ओपननंतर ती दुबई येथे होणाऱ्या टेनिस चॅम्पियनशिपमध्ये भाग घेणार आहे. ही तिची शेवटची टेनिस स्पर्धा असेल. असे सांगण्यात आले आहे.
“शरद पवारांनी सांगितले तर मी कोरड्या विहिरीत सुद्धा उडी मारेल”; आमदार निलेश लंके यांचे मोठे विधान