राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) कायम चर्चेत असतात. मागच्या काही दिवसापासून काही वादग्रस्त वक्तव्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. दरम्यान आता जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे. आव्हाड यांच्या तत्कालीन बॉडीगार्डने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
काकांनी दिली नोरा फतेहीला टक्कर; व्हिडीओ पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क
आव्हडांचे तत्कालीन बॉडीगार्ड वैभव कदम यांनी आत्महत्या केली आहे. वैभव कदम यांचा मृतदेह आज ठाण्यामधील एका रेल्वेमार्गावर आढळून आला आहे. माहितीनुसार, जितेंद्र आव्हाड आणि अनंत करमुसे यांच्यातील महाविकास आघाडी काळातील मारहाण प्रकरणामध्ये वैभव कदम हे महत्त्वाचे आरोपी असल्याचे बोलले जात आहे.
धोनीच्या आयुष्यात बायकोच्या आधी खास होती ‘ही’ व्यक्ती; लग्न करणार होता पण…
त्यामुळे आता त्यांनी नक्की आत्महत्या केली का हत्या झाली हा प्रश्न उपस्थित झाला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात देखील खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणाचा संपूर्ण तपास पोलीस यंत्रणा करत आहे.