मोठी बातमी! गडकरींना आलेल्या धमकीच्या फोन कॉलचे कर्नाटक कनेक्शन?

Big news! Karnataka connection to Gadkari's threatening phone calls?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन ( Death threat) आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे. एकदा नाही, दोनदा नाही तर तब्बल तीनदा नितीन गडकरी यांना धमकीचा फोन येऊन गेला आहे. यामुळे नितीन गडकरी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. यांनतर याप्रकरणाची कसून तपासणी चालू आहे. दरम्यान तपासानुसार धमकीच्या फोन कॉलचा संबंध कर्नाटकात असल्याचे समोर आले आहे.

बिग ब्रेकिंग! कोल्हापूरमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग

आज ( दि.14) सकाळी साडे अकराच्या सुमारास धमकीचा पहिला फोन आला होता. नितीन गडकरी ( Nitin Gadkari) यांच्या खामला येथील जनसंपर्क कार्यालयात हा फोन आला होता. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी खामला जनसंपर्क कार्यालयात धाव घेतली असून तपास सुरू आहे. याप्रकरणामध्ये नागपूर पोलिसांसह दहशतवादविरोधी पथक आणि आयबीचे पथक देखील तपास कामात गुंतले आहेत.

VIDEO: सिनेमांमधील डायलॉग म्हणणारा चहावाला! देशातील सर्वात टॅलेंटेड चहावाल्याचा व्हिडीओ होतोय व्हायरल

दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार भाजपचे जेष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासाठी आलेल्या या धमकीच्या कॉलवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मला खंडणी द्या अन्यथा मी गडकरींना जिवंत सोडणार नाही असे यामध्ये सांगण्यात आले आहे. तसेच या कॉलवर दाऊद नावाचा देखील उल्लेख करण्यात आला आहे.

पंकजा मुंडे ठाकरे गटात जाणाऱ्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *