Karnataka Legislative Assembly: कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुकांबद्दल प्रचंड चढाओढ होती. पण अखेर तो तिढा सुटला. मागच्या ४-५ दिवसांच्या अटीतटीं नंतर अखेर मुख्यमंत्री पदाच्या विजयाची माळ सिद्धारमैया (Siddha Ramaiya) यांच्या गळ्यात पडली आहे.
Maternity Leave | खुशखबर ! महिलांच्या प्रसूती रजेत होणार वाढ ; नीती आयोगाने केली शिफारस
सिद्धारमैया मुख्यमंत्री तर डीके शिवकुमार ( DK Shiv Kumar) यांना उपमुख्यमंत्रीपदाची माळ घालण्यात आली आहे. सिद्धारमैया हे काँग्रेसचे जेष्ठ नेते आहेत. याआधीही त्यांनी मुख्यमंत्री पदाचा भार पेलला आहे. त्याचबरोबर प्रशासनावर त्यांची पकड मजबूत आहे. ही त्यांची स्ट्रॉंग बाजू आहे. नवीन मुख्यमंत्री उद्याचं पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे.
सिद्धरामय्या यांच्या नावाची घोषणा थोड्याच वेळात केली जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सिद्धारमैया उद्या दुपारी ३.३० या वेळेत पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत.
त्याच्यामुळे शपथविधी सोहळ्याची तयारी करण्याची सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
Gautami Patil | सेलेब्रिटींसाठी गौतमी पाटील नॉट रीचेबल ! नक्की काय आहे प्रकरण ?
डिके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री पदाबरोबरच विशिष्ट आणि महत्त्वपूर्ण खात्यांची जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या बंगळुरू मध्ये विधिमंडळाची बैठक होणार आहे. त्यावेळी पुढील रणनीतींवर चर्चा होणार आहे असं सांगितलं जात आहे.
मोठी बातमी! क्रिकेटच्या नियमात झाले मोठे बदल, WTC Final मध्ये ‘या’ तीन नियमांचा समावेश; जाणून घ्या…