आयसीआयसीआय (ICICI) बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर (Chanda Chakor) यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक अन्वेषण विभागाकडून अटक करण्यात आली होती. सोबतच त्यांचे पती दीपक कोचर देखील सीबीआयच्या अटकेत होते. आयसीआयसीआय बँकेत (ICICI Bank) केलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही अटक करण्यात आली होती. आता याबाबत कोचर दाम्पत्याला दिलासा मिळाला आहे.
‘या’ कारणामुळे शिंदे, फडणवीस, आणि ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसणार! चर्चाना उधाण
कोचर दाम्पत्याला प्रत्येकी 1 लाखांच्या रोख रक्कम भरून जमीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा (Bombay High Court) हा निकाल सीबीआयसाठी एक मोठा झटका आहे.
वेड चित्रपटाने खरंच वेड लावलय! पहिल्याच आठवड्यात कमावले ‘इतके’ कोटी रुपये; वाचून बसेल धक्का
दरम्यान, आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा वापर करून पती दीपक कोचर यांना फायदा मिळवून दिला आहे. असा आरोप चंदा कोचर यांच्यावर करण्यात आला आहे. त्या मुख्य कार्यकारी पदावर असताना एप्रिल 2012 मध्ये व्हिडिओकॉन ग्रुपने आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज घेतले होते. तब्बल 3,250 कोटी रुपयांचे हे कर्ज होते.
नाद करा पण आमचा कुठं! शेतकरी घालतोय हार्ले डेव्हिडसनवर दूध
यामधील 2810 कोटी रुपयांचे कर्ज व्हिडिओकॉन ग्रुपकडे थकीत होते. मात्र 2017 मध्ये चंदा कोचर आयसीआयसीआय च्या मुख कार्यकारी अधिकारी असताना हे कर्ज बुडीत जाहीर करण्यात आले. यामुळे पदाचा गैरफायदा घेतल्या प्रकरणी या दाम्पत्याला अटक करण्यात आली होती.