पुणे( Pune) शहरात मागील काही दिवसांपासून कोयता गँगचे कारनामे वाढले आहेत. लोकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी तरुण मुलांची टोळी तोडाफोडीचे प्रकार करत आहे. यासाठी कोयता व तलवारी यांसारखी धारदार हत्यारे वापरली जात आहेत.
“…तर अशोक सराफ आज मुख्यमंत्री असते”; राज ठाकरे यांनी केला मोठा खुलासा
दरम्यान कोयता गँगवर (Koyta Gang) कारवाई करण्यासाठी पोलीस मध्यंतरी चांगलेच दक्ष झाले होते. मात्र तरीदेखील मागच्या काहीदिवसापूर्वी पुणे येथील अजम कॅम्पस ( Ajam Campus) परिसरात तरुणांनी कोयता हातात घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून पाच ते सहा जणांनी हॉटेलमध्ये घुसून कोयत्याने तोडफोड केली.
“मेरी डीपी इतनी ढासू चित्रा मेरी सासू”; उर्फी जावेदचे ट्विट चर्चेत
दरम्यान, आता शिवाजीनगर पोलिसांनी या टोळीला अटक केले आहे. महत्वाची बाब म्हणजे, अटक केलेल्या आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या गॅंगकडून चार कोयते आणि दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.