बारामती: मागच्या बऱ्याच दिवसापासून लम्पीने राज्यासह देशामध्ये थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांची पशुधने दगावली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे. लम्पीने धुमाकूळ घातल्यामुळे जनावरांचे बाजारही बंद ठेवण्यात आले आहेत. जवळपास मागच्या चार महिन्यांपासून जनावरांचे बाजार बंद आहेत.
ऐकावं ते नवलच! मेकअप आवडला नाही म्हणून नवरीने केली पोलिसांत तक्रार
शासनाने महाराष्ट्रात (maharashtra) लम्पी आजाराच प्रादुर्भाव जास्त असलेल्या ठिकाणी जनावरांचे बाजार बंद ठेवले आहेत. सांगलीतील मिरजेतील दुय्यम बाजार समितीत भरणारा बाजार हा सगळ्यात मोठा समजला जातो.
सलमान खान ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात? चर्चाना उधाण
सांगलीतील मिरजेतील दुय्यम बाजार समितीतील बाजार हा सर्वात मोठा गुरांचा बाजार समजला जातो. पण सध्या हा बाजार बंद आहे यामुळे महाराष्ट्रसह कर्नाटक या राज्यांतील गाई, म्हैशी, असा जोडव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उदरनिर्वहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे ही बाजारपेठ लवकर सुरू करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, आता सरकारने वडगाव बारामती या ठिकाणचे म्हशीचे बाजार देखील सुरू केले आहेत. यामुळे मिरजेचा बाजार सुरु करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
युवा शेतकऱ्याची कमाल, सव्वा एकर पपईतून घेतले २३ लाखाचं भरघोस उत्पन्न; वाचा सविस्तर