मागच्या काही दिवसापुर्वी भगतसिंग कोश्यारी यांनी राजीनामा देणार असल्याची माहिती दिली होती. यांनतर नवीन राज्यपाल कोण असणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. याबाबत अनेक चर्चा चालू होत्या. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा (Resignation) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे.
“दीडशे नव्हे तर दोनशे जागा निवडून दाखवणार”, देवेंद्र फडणवीस कडाडले
त्यामुळे आता रमेश बैस (Ramesh Bais) यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मागच्या काही दिवसांपासून विरोधक कोश्यारी यांच्याविरोधात आक्रमक झाले होते. भगतसिंग कोशयारी यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती.
महाविकास आघाडीबद्दल बोलताना फडणवीसांची जीभ घसरली; म्हणाले, “मी त्यांच्या बापालाही…”
आता रमेश बैस यांची नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी बैस यांनी झारखंड राज्यपाल पदाचा कारभार सांभाळला आहे.
मोठी बातमी! महाविकास आघाडीतील 20 ते 22 आमदार सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात