
पुणे( Pune) शहरात मागील काही दिवसांपासून कोयता गँगचे कारनामे वाढले आहेत. लोकांमध्ये दहशत पसरवण्यालासाठी तरुण मुलांची टोळी तोडाफोडीचे प्रकार करत आहे. यासाठी कोयता व तलवारी यांसारखी धारदार हत्यारे वापरली जात आहेत. त्यामुळे ‘कोयता गँग’चा बंदोबस्त करण्यासाठी ‘स्पेशल स्कॉड’ निर्माण करण्यात आले होते.
ब्रेकिंग! अमोल मिटकरी यांच्या ‘त्या’ विधानामुळे बच्चू कडूंच्या अपघाताबद्दल संशय वाढला
त्यानंतर आता पुणे पोलिसांकडून कोयता गँगवर कारवाई करण्यात आली असून कारवाईदरम्यान पोलिसांनी गँगच्या मुख्य आरोपीला ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर पोलिसांनी ४० पेक्षा जास्त कोयते जप्त केले आहेत.
धक्कादायक! सिलिंडरचा स्फोट होऊन आख्ख कुटुंब उध्वस्त
माहितीनुसार, आता ‘कोयता गँग’चा बंदोबस्त करण्यासाठी ‘स्पेशल स्कॉड’ निर्माण करण्यात आले आहे. या पथकाच्या माध्यमातून गुन्हे रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांनी दिली आहे.
“फक्त बारामतीचा विकास केला म्हणजे मतदारसंघाचा विकास होत नाही” – चंद्रशेखर बावनकुळे