
अमरावतीमध्ये रेल्वेचा मोठा अपघात घडला आहे. रविवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास अमरावतीत (Amravati) टीमटाला ते मालखेड या रेल्वे मार्गावर मालगाडी घसरली (The freight train derailed) आहे.
शेतकऱ्यांनी चक्क स्मशानभूमीत साजरी केली दिवाळी, पंधरा दिवसांत सरकारकडून नुकसान भरपाईची मागणी
दरम्यान या अपघातात (accident) जवळपास 15-20 डब्बे रुळावरून घसरले आहे. मात्र, रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. तर नागपूर-मुंबई मार्गावरील अनेक गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान सुदैवाने या दुर्घटनेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू; ऐन दिवाळीत कुटुंबावर पसरली शोककळा
माहितीनुसार, ही मालगाडी कोळसा घेऊन जात असताना इंजनसह रुळावरून घसरली. यावेळी मोठा आवाज झाला आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक रेल्वेचे 15 ते 20 डबे रुळावरून खाली घसरले. इतकंच नाही तर मालगाडीचे इंजिन हे रुळाच्या बाजूला कोसळले. तर काही डबे हे रुळावर आडवे झाले. दरम्यान नागपूर, मुंबई जाणारी वाहतूक नरखेड मार्गे वळवण्यात आली असून काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या दुर्घटनेनंतर रेल्वे डबे रुळावरून बाजूला करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान घटनास्थळी रेल्वेचे कर्मचारी पोहोचले असून रेल्वे रुळावर आणण्याचे काम सुरू आहे.
तरुणांनो सावधान! आता ‘आयटम’ शब्द वापराल तर येईल होईल शिक्षा; वाचा नेमकं काय आहे प्रकरण?