मुंबई : मनेसे नेते वृशांत वडके यांना बलात्काराच्या आरोपाखील अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आता आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तिकीट मिळवून देईल , असे आमिष दाखवत वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केल्याचा आरोप वृशांत वडके यांच्यावर करण्यात आला आहे.
पपईची लागवड केल्यावर शेतकऱ्यांना मिळणार ‘एवढी’ सबसिडी, असा करा अर्ज
एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, मंबई महानगरपालिकेचे तिकीट देतो, असे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप वृशांत वडकेंवर करण्यात आलाय . या प्रकरणामध्ये वृशांत वडके यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी अटकेची कारवाई देखील केली आहे. बलात्कारासोबतच वृशांत वडके यांच्यावर धमकावल्याचा देखील आरोप आहे. निवडणुकीसाठी तिकीट देईल असे म्हणत गैरफायदा घेतल्याचं एका महिलेने म्हटले आहे.
वृशांत वडके यांच्या विरोधात एका ४२ वर्षीय महिलेने बलात्कार केल्याचा आरोप केलाय . सप्टेंबर २०२१ ते जुलै २०२२ या कालावधिमध्ये वेगेवेगळ्या ठिकाणी शारीरिक संबंध ठेवत वडके यांनी माझी फसवणूक केली. त्याचबरोबर आगामी निवडणुकीत तिकीट मिळवून देण्याचे देखील आमिष वृशांत वडकेंनी दाखवले, असा आरोप या महिलेने केलाय.
State Govt: राज्य सरकारची विशेष मोहीम! या कालावधीत होणार ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’