भारतीय संस्कृतीमध्ये रामनवमीला जास्त महत्त्व दिलं जातं. आज देशभर रामनवमीनिमित्त अनेक कार्यक्रम असतात नागरिंकामध्ये प्रचंड उत्साह पहायला मिळतो. या निमित्तानं विवध कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहे. दरम्यान आज रामनवमी उत्सवादरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
साऊथचा हिरो अल्लू अर्जुनची संपत्ती पाहून डोळे पांढरे होतील
आंध्र प्रदेशमधील वेणुगोपाल स्वामी मंदिराला (Venugopal Swamy Temples in Andhra Pradesh) भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. रामनवमी उत्सवादरम्यान पश्चिम गोदावरी येथील वेणुगोपाल स्वामी मंदिराला आग लागली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या मंदिरामध्ये शॉट सर्किट होऊन आग लागली आहे. आता भाविकांना मंदिरातून बाहेर काढण्यात आले असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न चालू आहेत. ANI वृत्तसंस्थेने याचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
#WATCH | Andhra Pradesh: Fire breaks out at a temple in Duva village in West Godavari district during Rama Navami celebrations. No casualties reported. pic.twitter.com/IsHdVh2Tcd
— ANI (@ANI) March 30, 2023
जय श्रीरामचा गजर, बुलेट स्वारी अन् नवनीत राणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल