सध्या एक धक्कदायक घटना समोर आली आहे. आज पहाटे मुंबईतल्या साकीनाका भागात (Sakinaka in Mumbai) हार्डवेअरच्या (hardware) दुकानाला आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग (fire) एवढी भीषण होती की या आगीमध्ये संपूर्ण दुकान जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे.
कांदा प्रश्नावरून उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “कांद्याला किती खोके…”
दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साकीनाका या मेट्रो स्टेशनच्या जवळच्या दुकानाला ही भीषण आग लागली आहे. हार्डवेअरचे दुकान संपूर्ण जाळून खाक झाले आहे. त्यामुळे या दुकानाच्या मालकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (fire brigade) गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यांनतर त्या ठिकाणची आग हळूहळू नियंत्रणात आली. तेथील काही स्थानिकांनी या घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर देखील शेअर केला आहे. माहितीनुसार, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ८ ते १० गाड्या आल्या असून फायर कुलिंगचं (Fire cooling) काम या ठिकाणी चालू करण्यात आलं आहे.
“तुम्ही नाव चोरलं, चिन्ह चोरलं, पक्ष चोरला, पण…”, उद्धव ठाकरे कडाडले
या भीषण आगीमध्ये दोन दुकानांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. मात्र ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्प्ष्ट झालेले नाही. घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले आहेत.