पुणे : आज ३० ऑक्टोबर रोजी राज्यामधील विविध दूध संघांची बैठक पुण्यातील (Pune) कात्रज या ठिकाणी पार पडत आहे. या बैठकीमध्ये उपस्थित सदस्यांनी दूध खरेदीचे दर वाढवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे राज्यातील दुधाचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी गौतमी पाटील नक्की आहे तरी कोण? वाचा सविस्तर
देशभरात लंम्पि आजाराने धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रातही विविध जिल्ह्यात जनावरांना लम्पी आजाराची लागण झाल्यामुळे दूध उत्पादक चिंतेत आहेत. लम्पी आजारामुळे अनेक जनावरे दगावली आहेत त्यामुळे दूध टंचाई निर्माण होण्याची शक्यता होऊन दुधाचे दर आणखी वाढू शकतात.
Kili Paul: किली पॉल गातोय ‘तुझ मे रब दिखता है…’; नक्की कोणाच्या प्रेमात पडला?
कात्रज (Katraj) या ठिकाणच्या दूध (Milk ) डेअरीमध्ये शासकीय आणि खाजगी दूध उत्पादन संघांची बैठक पार पडली. अमूल सारख्या दूध कंपन्या जास्त दराने दूध खरेदी करत आहेत त्यामुळे आपल्याला देखील आगामी काळात दूध खरेदीचे दर वाढवावे लागतील, अशी चर्चा या बैठकीत झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दूध दरवाढीचा फटका बसणार आहे.