सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काँग्रसचे दिवंगत खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला काल कळमनुरी या ठिकाणी करण्यात आलाय.
बॉलिवूडसाठी मोठा धक्का, सलमान खानच्या ‘चोरी चोरी चुपके चुपके’ चित्रपट निर्मात्याचे दु:खद निधन
आता या हल्ल्यातून प्रज्ञा सातव सुरक्षित असून कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही. त्यांच्या सभोवताली जास्त जमाव असल्याने हल्ला करणाऱ्या आरोपीला देखील अटक करण्यात आली आहे. मात्र हल्ल्यानंतर त्यांच्या सुरक्षिततेची चिंता व्यक्त केली जात आहे.
बॉलिवूडसाठी मोठा धक्का, सलमान खानच्या ‘चोरी चोरी चुपके चुपके’ चित्रपट निर्मात्याचे दु:खद निधन
या हल्ल्यानंतर स्वतः प्रज्ञा सातव यांनी देखील याप्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “मी महिला लोकप्रतिनिधी असल्याने मला घाबरवून घरी बसवण्याचा प्रयत्न होता. मात्र मी घाबरणार नाही”. या शब्दामध्ये त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अरुंधतीच्या लग्नात पुन्हा नव विघ्न येणार; आप्पांनी दिला ‘हा’ इशारा