शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) इतिहासावर आधारित अनेक चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत. आता लवकरच महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar)यांचा देखील चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटावरून विदविवाद निर्माण झाला आहे. यामध्येच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवरायांच्या जीवनावर आजपर्यंतचासर्वात मोठा चित्रपट काढणार असल्याची माहिती समोर आली आहे.
नियमित वीजबिल देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर; देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
राज ठाकरे (Raj Thackeray) हे एका मुलाखतीमध्ये म्हणाले की, “राजकारण आणि चित्रपट या दोन्ही गोष्टी खूप मोठ्या आहेत. निवडणुका कधीच संपत नसल्याने चित्रपट निर्मितीला देखील वेळ देता नाही. पण शिवाजी महाराजांवर मोठा चित्रपट असावा असं मला कायम वाटत, सध्या त्या दृष्टीने माझं काम सुरु आहे. हा चित्रपट तीन भागांमध्ये प्रदर्शित केला जाईल” असं म्हणत राज ठाकरेंनी आपल्या चित्रपटाची घोषणा केली आहे.
“मला काही झालं तर…”, संजय राऊतांचा राज्य सरकारला गंभीर इशारा
मी एक राजकारणी माणूस असलो तरी चित्रपट निर्मिती ही माझी पहिली आवड आहे. त्यामुळे कोणतापन चित्रपट मी त्याच दृष्टीने पाहतो. यामध्ये बरेच चित्रपट घाईघाई बनविले जात असल्याचे जाणवत आहे. अशी भावना देखील राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
ब्रेकिंग! भगतसिंग कोश्यारींची राज्यपाल पदावरुन होणार हकालपट्टी?