सध्या सगळीकडेच इलेक्ट्रिक बाईक्सची (Electric Bike) क्रेझ वाढली आहे. आता लोक इतर बाईक्सच्या तुलनेत या बाईकलाच प्राधान्य देतात. ही इलेक्ट्रिक बाईक पेट्रोलच्या तुलनेमध्ये खूप कमी खर्चात वापरता येते. या बाईकमुळे पर्यावरणाचं प्रदूषणापासून रक्षण होतं. तुम्ही जर इलेक्ट्रिक बाइक्सचे चाहते असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे आता या गाड्यांची किंमत वाढणार आहे.
इलेक्ट्रिक बाईक्सला मिळणाऱ्या अनुदानात अवजड उद्योग मंत्रालयाने घट केली आहे. त्याचाच परिणाम म्हणून इलेक्ट्रिक बाईक्सवर आता फक्त 10 हजार रुपये प्रति किलोवॅट एवढेच अनुदान मिळणार आहे. याआधी हीच रक्कम 15 हजार एवढी होती. फेम-२ साठी असणाऱ्या दुचाकींसंदर्भात हा मोठा निर्णय घेण्यात आलाय. 19 मे रोजी याबाबत अधिसूचना जारी करण्यात आल्या होत्या.
Ambani House Visit | फक्त २ रुपयात अंबानींचे घर पाहण्याची सुवर्णसंधी; कसं ते जाणून घ्या
या निर्णयाचा परिणाम इलेक्ट्रिक्स बाईक्सच्या किंमतींवर मोठ्या प्रमाणात होणार आहे. या निर्णयामुळे इलेक्ट्रिक दुचाकी तयार करणाऱ्या कंपन्यांनी वाहनांच्या फीचर्स आणि बॅटरीमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे या इलेक्ट्रिक्स बाईक्सची किंमत जवळजवळ 25 ते 35 हजारांनी वाढू शकते.
सर्वसामान्यांसाठी गुडन्यूज! एलपीजी गॅसचे दर झाले कमी, जाणून घ्या नवीन दर
कोणकोणत्या इलेक्ट्रिक बाइक्सची किंमत वाढली आहे?
मोदी सरकारच्या या निर्णयामुळे एथर 450 एक्स या ई-बाईकची किंमत तब्बल 32 हजार 500 रुपये एवढी झाली आहे. तर ओला कंपनीच्या एस 1 या मॉडेलच्या किमतींमध्ये 15 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळेच या ई-बाईकची किंमत तब्बल 1 लाख 29 हजार 999 रुपये एवढी झाली आहे.
अवघ्या महिनाभरातच तुकाराम मुंढे यांची बदली; ‘या’ महत्त्वाच्या पदावर नियुक्ती