मोठी बातमी! नाना पटोले यांचे प्रदेशाध्यक्ष पद धोक्यात? बाळासाहेब थोरात यांच्या तक्रारीची पक्षश्रेष्ठी दखल घेणार

Big news! Nana Patole's state president's post in danger? The party will consider Balasaheb Thorat's complaint

नाशिक पदवीधर निवडणुकीमुळे काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आले आहेत. काँग्रेसचे वरीष्ठ नेते बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat) यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. या पार्श्वभूमीवर नवीन माहिती समोर आली असून नाना पटोले ( Nana Patole) यांच्या पदासंदर्भात पक्षश्रेष्ठी गंभीर विचार करत आहेत.

“नोकरीच काहीतरी जुगाड करुन द्या, नाही तर मी पळून जाईल”, तरूणीचं उपमुख्यमंत्र्यांना पत्र

पदवीधर निवडणुकांमध्ये काँग्रेसकडून सत्यजित तांबे यांना एबी फॉर्म दिला गेला नाही. त्याऐवजी त्यांचे वडील सुधीर तांबे यांना फॉर्म देण्यात आला. यामुळे सत्यजित तांबे यांना अपक्ष म्हणून अर्ज दाखल करावा लागला. यानंतर ते निवडणूक जिंकले सुद्धा!

महावितरण अधिकाऱ्याशी फाडफाड इंग्रजीमध्ये बोलणाऱ्या शेतकऱ्याला मिळाला मीटर!

दरम्यान सत्यजित तांबे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाणूनबुजून चुकीचा एबी फॉर्म दिल्याचा आरोप केला. मात्र पटोले यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. या सर्व प्रकरणात सत्यजित तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात यांना काँग्रेसने अंधारात ठेवले.

मोठी बातमी! आमदार शहाजीबापूंच्या ताफ्यातील पोलीस गाडीचा भीषण अपघात; १ जागीच ठार

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या काळातील अनेक निर्णय बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा न करता घेतले. यामुळे बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिला. यामुळे आता पक्षश्रेष्ठींनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.

कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी थेट देशाचे गृहमंत्री अमित शाह उतरणार मैदानात!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *