
सध्या नवनीत राणांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नवनीत राणांना (Navneet Rana) न्यायालयाने मोठा झटका दिल्याची माहिती समोर आली आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणी नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंह कौर यांना फरार म्हणून शिवडी कोर्टाकडून घोषित करण्यात आले आहे. यामुळे त्यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
एका रात्रीत बनला लखपती, तरुणाला ७० लाखांची लागली लॉटरी
शिवडी कोर्टाकडून हरभजन सिंह कौर फरार म्हणून घोषित करण्यात आले. त्याचबरोबर नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांना एक हजार रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे.
सानिया मिर्झाची एकूण संपत्ती वाचून तुम्हीही व्हाल थक्क!
सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेली दोन्ही प्रकरण वेगळी असल्याचे शिवडी कोर्टाने नोंदवले आहे. पुढच्या महिन्याभरात कोर्टामध्ये जर हजर राहिले नाही तर प्रॉपर्टी देखील जप्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता १६ फेब्रुवारीपर्यंत या प्रकरणाची सुनावणी स्थगित करण्यात आली आहे.