राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक ( Nawab Malik) यांच्या जामिनावर काल (दि.6) सुनावणी झाली. मात्र यावेळी सुद्धा मलिक यांना दिलासा मिळाला नसून त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. कुर्ला ( Kurla) येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीने मलिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून मागील अनेक दिवसांपासून मलिक जामीनाच्या प्रतीक्षेत आहेत.
“…तेव्हापासून मला संसदेत जाण्याची भीती वाटते”; शरद पवारांचा नरेंद्र मोदींना जबरदस्त टोला
सध्या कुर्ल्यातील एका खासगी रुग्णालयात नवाब मलिक यांच्यावर उपचार सुरू आहेत. यासाठी न्यायालयाची परवानगी घेण्यात आली आहे. 1993 च्या मुंबई ब्लास्टमध्ये आरोपी असणाऱ्या लोकांकडून जमीन खरेदी केली असल्याचा आरोप मलिक यांच्यावर आहे. त्यांनी गोवावाला कंपाउंडमधील जागा भाडेतत्वावर दिली व त्यामधून आलेल्या पैशांमधून वांद्रे, कुर्ला येथील फ्लॅट्स आणि उस्मानाबादमधील शेतजमीन खरेदी केली.
ब्रेकिंग! सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली; राहुल गांधी भेट घेण्यासाठी दिल्लीला पोहोचले
असे आरोप ईडीने ( ED) लावले आहेत. मात्र, नवाब मलिक यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान जामीन अर्ज करून देखील मंजूर होत नसल्याने दिवसेंदिवस मलिक यांचा कोठडीतील मुक्काम वाढत आहे. कालच्या न्यायालयीन सुनावणीमध्ये दिलासा मिळेल अशी आशा होती. परंतु तिथेही मलिक यांच्या पदरी निराशा आली आहे.
मांढरदेव यात्रा कालावधीत प्रतिबंध आदेश; पशुहत्या होऊ नये यासाठी प्रशासन तत्पर