पंढरपूर: सध्या कारखान्याचे अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी चौकशा सुरु आहेत. यामध्येच आता आता पंढरपूरमधून (Pandharpur) एक महत्वाची बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे सध्या अडचणीत सापडले आहेत.
धक्कादायक! पाटस येथे ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने पती, पत्नी अन् ४ वर्षाच्या मुलाचा मृत्यू
कल्याणराव काळे (Kalyanrao Kale) हे सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. आता त्यांना सीताराम महाराज साखर कारखान्यासाठी (Sitaram Maharaj Sugar Factory) गोळा केलेले सभासदांचे भाग भांडवल व्याजासह परत देण्याचे आदेश सेबी ने दिले आहे. त्यामुळे आता त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
‘या’ कारखान्याची २५०० पहिली उचल; ऊसाचे बिल लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार
दरम्यान, पंढरपूर तालुक्यातील कल्याण काळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून त्यांनी सीताराम साखर कारखान्याच्या शेअर्सपोटी 17 कोटी रुपयांची रक्कम गोळा केली होती. नंतर याबाबत सेबीकडे तक्रारी देखील दाखल केल्या. यामुळे आता एकूण 41 कोटी रुपयांची रक्कम जवळपास पाच हजार सभासदांना पाच जानेवारी पर्यंत परत करण्याचे आदेश सेबीने दिले आहेत.
गायरान जमीनीवरील गरीबांची घरे अतिक्रमण म्हणून काढली जाणार नाहीत