मुंबई | गेली नऊ महिन्यात महाराष्ट्रात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिंदेंनी बंड केल्यानंतर न्यायालयात अनेक वादांवर सुणावणी सुरु आहे. अशातच गेली अनेक वर्ष उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना चिन्हाबाबतीत आणि पक्ष नावाबाबतीत एक मोठा निर्णय देण्यात आला होता.
”उर्फी जावेद मुलगी नाही किन्नर”
शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे मूळ शिंदे गटाचं असल्याचा निकाल देत निवडणूक आयोगानं शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाला सुपूर्द केलं होतं. या निर्णयाचा ठाकरेंच्या पक्षाला जोरदार धक्का बसला होता. आयोगाचा हा निर्णय ठाकरेंना मान्य नसल्याचं सांगत ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
“गोप्या म्हणजे भट्टीच्या तव्यावर बसलेल्या बाबासारखा”, अमोल मिटकरी यांचा गोपीचंद पडळकरांवर हल्लाबोल
सध्या सर्वाेच्च न्यायालयात यावर सुनावणी सुरु आहे. याचदरम्यान अंधेरीच्या पोटनिवडणूका लागल्याने शिंदे आणि ठाकरे गटाला तात्पुरता पक्ष चिन्ह आणि पक्षाचं नाव दिलं गेलं होतं. ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मशाल हे चिन्ह मिळालं होतं. हे नाव वापरण्याची मुदत सोमवारी 27 मार्चपर्यंत ठाकरे गटाला होती.
अभिनेत्री अलका कुबल यांचा ‘तो’ फोटो व्हायरल; पाहा Photo
आता हेच नाव आणि चिन्ह सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत ठाकरे गटाला वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. दरम्यान, शिंदेंनी घेतलेली मुख्यमंत्रीपदाची शपथ आणि भाजपसोबत स्थापन केलेलं सरकार घटनाबाह्य आहे. असा आरोप ठाकरेंनी केला होता. गेली 8 महिने ही सुणावणी कोर्टात सुरु होती. यावर लवकरच निकाल लागणार आहे.