Tuljapur | मोठी बातमी! तुळजाभवानी मंदिरात शॉर्ट कपडे घातल्यास भविकांना नो एन्ट्री

Tuljapur | Big news! No entry for devotees wearing short clothes in Tuljabhavani temple

तुळजाभवानी मंदिर हे महाराष्ट्रातील अनेकांची कुलस्वामिनी असल्याने भाविक देवदर्शनासाठी जातात. परंतु आता जे भाविक देवदर्शनासाठी जाणार आहे त्यांना तुळजाभवानी मंदिरातील नियमावलीचे पालन करावे लागणार आहे. जे भाविक नियमांचे पालन करणार नाही त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. मंदिराच्या परिसरात नियमावलीचे फलक लावण्यात आले आहे. हा निर्णय जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत मंदिर संस्थानच्या बैठकीत घेतला आहे.

Breaking । शंभूराज देसाईंची मोठी घोषणा; जलयुक्त शिवार योजना आजपासून सुरू

या नियमावलीची अंमलबजावणी गुरुवारपासून करण्यात करण्यात आली आहे. या मंदिरामध्ये वेस्टर्न कपडे घालणाऱ्यांना व जे अंग प्रदर्शन करणारे कपडे घालतात यांना या मंदिरात प्रवेश बंद करण्यात आला आहे. संस्थानातील अनेकांनी या निर्णयाचे स्वागतच केले आहे. अंगप्रदर्शन, उत्तेजक, असभ्य, हाफ पॅन्ट, बर्मुडा घालणाऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. भारतीय संस्कृती ही जपली जावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Fake Aadhar Card | तरुणांनी पायाचे ठसे वापरून बनवले आधारकार्ड, यानंतर केलं असं की वाचून तुम्हालाही बसेल धक्का

कपडे परिधानाचा नियम हा फक्त स्त्रियांसाठीच नसून पुरुषांसाठी सुद्धा आहे. ड्रेसकोडबाबत मंदिरामध्ये कडक नियम लागू करण्यात आले आहे. गुरुवारी बर्मुडा घालून आलेल्या तरुणांना मंदिरामध्ये प्रवेश दिला नाही. 18 मे रोजी जिल्हाधिकारी आणि मंदिराचे अध्यक्ष यांच्या निरीक्षणाखाली हे फलक लावण्यात आले होते. तसेच मंदिरातील कर्मचारी, संस्थापक व सुरक्षारक्षक देखील उपस्थित होते.

Police Bharti । पोलीस भरती परीक्षेत घडला धक्कादायक प्रकार, विद्यार्थ्यांनी कानात मायक्रोहेडफोन लावून दिले पेपर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *