
जीमेल ( Gmail) हे स्मार्टफोन वापरणाऱ्या प्रत्येक माणसाकडे असते. कामाच्या ठिकाणी जीमेल हे संवादाचे अतिशय सोयीचे माध्यम समजले जाते. व्यवहारिक भाषेसाठी जीमेल ही आता गरज बनली आहे. जीमेल ही खरंतर गूगलची (Google) सेवा आहे. आतापर्यंत गूगलकडून ही सेवा फ्री मध्ये दिली जात होती. मात्र आता ही फ्री सेवा बंद होऊ शकते. अगामी काळात गूगल जीमेल सेवा पेड करण्याची शक्यता आहे.
Crime | कार्यक्रमात नाचताना धक्का लागला म्हणून वादावादी! मध्ये पडणाऱ्या तरुणाच्या पोटात घुपसला चाकू
गूगलच्या जीमेल सेवेचे जगभरात मोठया संख्येने वापरकर्ते आहेत. जर गूगलने ही सेवा पेड ( Paid service) सुरू केली. तर जीमेल वापरण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील. गूगलने आता जीमेलवर जाहिरात (Advertisement) दाखवायला सुरुवात केली आहे. जीमेलची वापरकर्ते संख्या जास्त असल्याने यापुढे त्यावर मोठ्या प्रमाणात जाहिराती दाखवल्या जातील. युट्युबच्या पाऊलावर पाऊल ठेवत कंपनी आता जीमेलवर जाहिरात दाखवत पैसे कमावणार आहे.
गुगलने जीमेलच्या इमेल लिस्ट मध्येच जाहिराती टाकायला सुरुवात केली आहे. यामुळे मेल वाचताना लोकांना अडचणी निर्माण होत आहेत. वापरकर्त्यांच्या सांगण्यानुसार जाहिरातीमुळे मेल्स नेव्हीगेट करायला अडचण निर्माण होत आहे. दरम्यान अगामी काळात या जाहिराती हटवण्यासाठी जीमेल वापरकर्त्यांकडून ठराविक पैसे सुद्धा आकारु शकते.
पुणे लोकसभा पोटनिवडणूकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला! ‘या’ नेत्याला मिळणार संधी…