मुंबई : दक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. यावर्षी या अभिनेत्याने ‘लायगर’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. पण आता या चित्रपटामुळे विजय देवरकोंडाला ईडीने धारेवर धरलं असल्याची माहिती समोर आली आहे.
1000 इंजिनिअर्स तरुणांना मिळणार नोकरीची संधी; ‘या’ मोठ्या कंपनीने जाहीर केली भरती
लायगर चित्रपटाच्या फीडिंगवरून अभिनेत्याला ईडी चौकशीला सामोरे जावे लागले. या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते (Director and Producer) यांची देखील चौकशी झाली. हैदराबाद येथील एजन्सीच्या प्रादेशिक कार्यालयात अधिकाऱ्यांसमोर ही चौकशी झाली आहे.
माहितीनुसार, ” या चित्रपटाला निधी देण्यासाठी वापरण्यात आलेला पैसा हा फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्टचे उल्लंघन करून परदेशातून आणल्याचा आरोप या चित्रपटाच्या टीमवर केला जातोय. त्यामुळे या प्रकरणाबाबत माहिती मिळवण्यासाठी ईडीने अभिनेता विजय देवरकोन्डची चौकशी केली.
ईडी चौकशीनंतर विजयने या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, ” हा माझ्या जीवनाचा एक अनुभव आहे. ईडीने मला बोलावल्यावर तिकडे जाणे हे माझे कर्तव्य आहे. मी तिकडे जाऊन त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत”. या शब्दांमध्ये अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली आहे.
ब्रेकिंग! सोलापूर सीमालगतची ‘ही’ 22 गावे कर्नाटकात जाणार
दरम्यान, दक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाने (Vijay Deverakonda) लायगर या चित्रपटातुन बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटामध्ये विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री अनन्या पांडे हे मुख्य भूमिकेमध्ये आहेत. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही कमाल दाखवू शकला नाही.