पुण्यातील लोणी काळभोर परिसरामधील रामदारा ( Ramdara ) येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये बैलगाडा शर्यतीसाठी बांधलेला स्टेज कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे.
शरद पवारांबद्दल बोलताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली; नको तेच बोलले अन्..
सूत्रांच्या माहितीनुसार, बाळासाहेब काशीनाथ कोळी (वय ४६, रा. निनाम पाडळी, जि. सातारा) बैलगाडा शर्यती दरम्यान मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मयूर प्रमोद लोखंडे, विकास वाल्मिक ढमाळे, शुभम विजय लोखंडे हे तीनही तरुण गंभीर जखमी झाले आहे. लोणी काळभोर ( Loni kalbhor ) पोलिसांनी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती दिली आहे.
अजित पवारांबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊत यांनी केली दिलगिरी व्यक्त; म्हणाले…
शिवसेनेच्या वतीने पुण्याजवळील वडकी ( Vadaki ) येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शर्यतीवेळी काल सायंकाळी चेंगराचेंगरीची घटना घडली. काल जोरदार वारे सुटल्यामुळे स्टेज कोसळला. हा स्टेज आडोशाला थांबलेल्या व्यक्तींच्या अंगावरती कोसळल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली.
भीषण अपघात! कोंबड्या वाहून नेणाऱ्या दोन पिकअपची एकमेकांना जोरदार धडक