राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्यावर काल शाईफेक करण्यात आली आहे. आता याबाबत पोलिसांनी दखल घेतली असून. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
चंद्रकांत पाटलांवर शाई फेकणारा व्यक्ती नेमका कोण?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज भास्कर घरबडे, विजय धर्मा ओव्हाळ आणि धनंजय भाऊसाहेब इजगज या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आता त्यांना अटक करण्याची कारवाई देखील करण्यात आली आहे.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या भोवती अंगरक्षक असून देखील कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर शाई फेकून हल्ला केलाय. चिंचवड गावामध्ये ते एका कार्यकर्त्याच्या घरी गेले असता त्या ठिकाणी हा सर्व प्रकार घडला आहे.
चंद्रकांत पाटलांवर शाईफेकीच्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
चंद्रकांत पाटील म्हणाले, “ पहिल्या काळात शाळांसाठी अनुदान देत नव्हते. तरीदेखील महापुरुषांनी शाळा उघडल्या. पण, आता लोकं शाळांच्या अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहत आहेत. त्याकाळी महापुरुषांना सरकारनं शाळा सुरु करण्यासाठी अनुदान दिले नाही, त्यांनी लोकांकडं भीक मागितली”.