
संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री (Fulambri) पंचायत समितीसमोर एका सरपंचाने शेतकऱ्यांसाठी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले आहे. शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करून देण्यासाठी पंचायत समितीचे अधिकारी लाच मागतात यामुळे संतप्त होऊन सरपंच (Sarpanch) मंगेश साबळे यांनी थेट गळ्यात २ लाख रुपयांच्या नोटांची माळ घालून आंदोलन केले आहे.
मोठी बातमी! अमूल दुधाच्या दरात पुन्हा वाढ
आता त्यांच्या या प्रकारानंतर त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये ते सांगत आहेत की, मी अपक्ष म्हणून निवडून आलोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कायमच हे सरकार शेतकऱ्यांचं असल्याचं सांगतात. मात्र फुलंब्री पंचायत समितीच्या बीडीओ मॅडम लाचेची मागणी करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
जीवे मारण्याच्या धमकीनंतर संजय राऊत यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
या प्रकरणी बीडीओ ज्योती कवडदेवी यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, सरपंच मंगेश साबळे यांची व्हीडिओ क्लिप बदनामीकारक असून कुठल्याही पैशांची मागणी करण्यात आलेली नाही. त्यांच्या गावातील विहिरींची सर्व प्रकरण प्रोसेसमध्ये आहे. त्यामुळे आता आम्ही या व्हायरल व्हीडिओप्रकरणी फुलंब्री पोलिसांत तक्रार दिली असून कारवाई होणार असल्याचं देखील बीडीओ ज्योती कवडदेवी यांनी यावेळी सांगितलं आहे. त्यामुळे आता सरपंच मंगेश साबळे यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
ब्रेकिंग! छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा केल्याप्रकरणी दोन मुख्य आरोपींना पोलिसांकडून अटक