Site icon e लोकहित | Marathi News

मोठी बातमी! राज्यातली पोलिस भरती पुढे ढकलली, कारण…

Big news! Police recruitment in the state postponed, because…

राज्यातील पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव पोलिस भरती पुढे ढकलली असल्याचं सांगण्यात येतंय. पुढील महिन्यामध्ये 14 हजार 956 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार होती. आता पोलिस भरतीसंदर्भातली नवी जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आज पोलिस महासंचालक कार्यालयाकडून एक पत्रक जारी करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये भरती प्रक्रिया प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलल्याचं सांगण्यात आलेलं आहे.

बिग ब्रेकिंग! ‘या’ तणनाशकावर बंदी; शेतकरी झाले नाराज.. नेमकं काय आहे कारण?

येत्या काही दिवसात होणारी पोलिस भरती पुढे ढकलली आहे. एक नोव्हेंबरपासून भरती प्रक्रियेला सुरुवात होणार होती. राज्यभरात तब्बल 14,956 पदांसाठी भरती होणार होती. याला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती दिली आहे. या भरतीबाबत पुढील आठवड्यात निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, कालच राज्याच्या पोलिस मुख्यालयातून प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर केले होते.

धक्कादायक! कुळधरणमध्ये आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

रिक्त 14 हजार 956 जागांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 1 हजार 811 जागा, अनुसूचित जमातीसाठी 1 हजार 350 जगा, विमुक्त जाती (अ) या प्रवर्गासाठी 426 जागा, भटक्या जमाती (ब) साठी 374 जागा, भटक्या जमाती (क) साठी 473 जागा, भटक्या जमाती (ड) साठी 292 जागा, विमुक्त मागास प्रवर्गासाठी 292 जागा, ओबीसींसाठी 2 हजार 926 जागा, ईडब्ल्यूएससाठी 1 हजार 544 जागा आणि खुल्या प्रवर्गासाठी 5 हजार 468 जागा; असं आरक्षण जाहीर करण्यात आलेलं होतं.

मोठी बातमी! आता भूमिहीनांना मिळणार जमीन; वाचा सविस्तर माहिती

Spread the love
Exit mobile version