मुंबई : दहीहंडी फोडण्यासाठी रचलेले थर कोसळून जखमी झालेला गोविंदा प्रथमेश सावंतचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. दीड महिन्यांपेक्षा जास्त दिवस तो मृत्यूशी झुंज देत होता. अखेर शनिवारी अखरेचा श्वास घेतला. तो अवघ्या २० वर्षांचा होता. प्रथमेशच्या निधनामुळेमुळे करीरोड परिसरात शोककळा पसरली.
जगात सर्वाधिक पैशाची उलाढाल दूध व्यवसायामध्ये होते, कारण…
दरम्यान, कोरोनाचे संकट ओसरल्यानंतर राज्यात दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला होता. दहिकाल्याच्या दिवशी १९ ऑगस्ट रोजी करीरोड येथील साईभक्त गोविंदा पथक घाटकोपर येथे दहीहंडी फोडण्यासाठी गेले होते. त्यावेळीच दहीहंडी फोडण्यासाठी रचलेला थर कोसळला आणि त्यामध्ये प्रथमेश गंभीर जखमी झाला.
Vinayak Raut: भाजपचे माजी मंत्री शिवसेनेत येण्याच्या तयारीत, विनायक राऊतांचा दावा
त्यावेळी प्रशमेशाला लवकरात लवकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून प्रशमेश मृत्यूशी झुंज देत होता. अखेर शनिवारी त्याने अखेरचा श्वास घेतला. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उपचारासाठी पाच लाख रुपये मदत म्हणून दिले होते. त्याचबरोबर माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे डॉक्टर प्रथमेशच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन होते. काही गोविंदा पथकांनी देखील प्रथमेशला आर्थिक मदत केली होती.
धक्कादायक! बसचा अपघात होऊन एका मुलासह 11 जणांचा होरपळून मृत्यू