एमपीएससी (Mpsc) परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी राज्यातील काही शहरांमध्ये आंदोलन सुरु केल आहे. एमपीएससीच्या राज्यसेवा परिक्षेचा नवीन अभ्यासक्रमावरून विद्यार्थी आक्रमक झाले असून राज्यातील काही शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले आहे.
पुणे शहराचे नामकरण “जिजाऊ नगर” व्हावे, राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी यांची मोठी मागणी
२०२५ पासून एमपीएससीच्या राज्यसेवा परिक्षेचा नवीन लागू करावा, अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. पुण्यातील अलका चौकात आज विद्यार्थी घोषणाबाजी करत आहेत. या पार्शवभूमीवर पुण्याच्या अलका चौकात पोलिसांचा कडक बंदोबस्त देखील करण्यात आला आहे. एमपीएससीच्या नवीन अभ्यासक्रमावरून विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून नवीन अभ्यासक्रम २०२३ पासून लागू न करता २०२५ पासून लागू करावा. अशी मागणी करत आहेत.
“पुण्याच्या नामांतराची गरज नाही”; अमोल मिटकरींच्या मागणीला आनंद दवेंचा विरोध
जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत हे आंदोलन हटणार नाही. अशी आक्रमक भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. पुणे, कोल्हापूर आणि औरंगाबाद या शहरातून विद्यार्थ्यांचे हे आंदोलन सुरु आहे