आज (2 एप्रिल) सायंकाळी ६ वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Naga) महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) जाहीर सभा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मागच्या दोन तीन दिवसापूर्वी संभाजीनगरमध्ये दोन गटात तुफान राडा झाला होता. यांनतर संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची पहिलीच बैठक होणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपच्या राजकारणावर शरद पवार स्पष्टच बोलले; म्हणाले, “आजच्या परिस्थितीत…”
या सभेसाठी महाविकास आघाडीचे सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार असून, सायंकाळी सहा वाजता सांस्कृतिक मंडळ मैदानवर ही सभा होणार आहे. त्यामुळे या सभेसाठी आयोजकांकडून जय्यत तयारी केली जात आहे.
‘चंद्रा’ गाणं गाऊन महाराष्ट्राला वेड लावलेला शाळकरी मुलगा आठवतोय का? आता गातोय चित्रपटातही…
हे नेते राहणार उपस्थित –
आज होणाऱ्या सभेला उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे यांच्याबसोबत महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे हे सर्व नेते एकाच मंचावरून कोणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संजय राऊतांना धमकी देणाऱ्या तरुणाबद्दल फडणवीसांनी केला मोठा खुलासा!