काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य चांगलेच भोवले आहे. मोदींवर केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली असून सुरत कोर्टाने राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांना मानहानी प्रकरणात दोषी ठरवले असून त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर त्यांना जामीन देखील मंजूर झाला. मात्र दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.
गौतमी पाटीलचा लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल; लोक म्हणाले ही तर…
खासदारकी काढून घेतल्याने राजकीय वातावरण चांगलाच तापल्याच आपल्याला पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांची खासदारकी काढून घेतल्याने काँग्रेसमध्ये देखील संतापाची लाट उसळली. सोशल मीडियावरही या कारवाईचा निषेध जातोय.
मुलींना लवकर मासिक पाळी का येते? नेमक काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर…
मागच्या काही दिवसापूर्वी राहुल गांधी यांना लोकसभेच्या गृहनिर्माण समितीकडून शासकीय बंगला रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान, आज राहुल गांधी यांनी शासकीय बांगला रिकामा केल्याची माहिती समोर आली आहे. खासदारकी रद्द झाल्याने राहुल गांधी यांना हा बंगला सोडावा लागला आहे. (Latest Marathi News)
अभिनेत्री रश्मिका मंदानाने केला मोठा खुलासा; म्हणाली, “माझ्या आईमुळे माझे आयुष्य…”