ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी संध्याकाळी कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की ट्रेनचे अनेक डब्बे मालगाडीवर चढले. सात डब्बे पलटी झाले आहेत. या अपघातामध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. Odisha Train Accident
धक्कादायक! मित्राचा वाढदिवस केला दणक्यात साजरा, अन् काढला काटा; होत ‘हे’ कारण
ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघाताने सर्वांनाच अस्वस्थ केले आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग हे अपघाताचे खरे कारण सांगितले आहे. ते म्हणाले की, इंटरलॉकिंगसाठीचा मार्ग नीट ठरवता न आल्याने मार्ग चुकला, असे समजू शकते. ही तांत्रिक चूक आहे की मानवी चूक. मात्र यात खरी चूक कुठे झाली, हे संपूर्ण अहवाल आल्यानंतरच कळेल. असं ते म्हणाले आहेत.
दरम्यान, आज पीएम मोदींनी सीएम नवीन पटनायक यांच्याकडून फोनवरून रेल्वे अपघाताची ताजी माहिती घेतली. पंतप्रधानांना माहिती देताना मुख्यमंत्री पटनायक म्हणाले की, जीव वाचवण्यासाठी शक्य ती सर्व कारवाई केली जात आहे.