अतिवृष्टीमुळे विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच नुकसान होऊन हातात आलेल्या पिकांना देखील हवा तसा दर मिळाला नाही. यामुळे विदर्भातील शेतकरी चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर खा.राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या पिकांना भाव मिळावा यासाठी विदर्भात राज्यव्यापी आंदोलन उभारले जाणार आहे. अशी माहिती विदर्भातील युवा आघाडीचे अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी दिली.
Salman Khan: “देव मुंबई पोलिसांचे भले करो”! सलमान खानचे ट्विट चर्चेत
जालना जिल्याच्या दौऱ्यावर असताना खा.राजू शेट्टी यांनी नुकतीच प्रशांत डिक्कर यांच्यासह विदर्भातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी कापसाला प्रती किंव्टल १३ हजार रुपये तर सोयाबीनला प्रती किंव्टल ९ हजार रुपये भाव मिळवून घेण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन उभे करण्याचे ठरले आहे.
“टिकल्या लावलेल्या मुलींकडे मुलं बघत नाहीत…”, मराठी अभिनेत्री राधिका देशपांडेची ‘ती’ पोस्ट चर्चेत
या महिन्याच्या पुढच्या पंधरवड्यात हे आंदोलन होणार आहे. “कापूस व सोयाबीनला योग्य भाव मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.” असे राजू शेट्टी यावेळी म्हणाले. तसेच सरकारकडून योग्य भाव मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांनी कापुस व सोयाबीन विकण्याची घाई करू नये, असे आवाहन देखील त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
“Activa स्कुटीच्या पुढच्या भागामध्ये कोब्रा नागाने केले घर; पाहा व्हायरल VIDEO