मोठी बातमी! राजू शेट्टी यांच्या मुलाला पोलिसांकडून अटक

Big news! Raju Shetty's son arrested by police

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे सध्या शेतकऱ्यांच्या मागण्यांवरून आक्रमक झाले आहेत. या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील दिलाय. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांना सहकारमंत्र्यांनी मुंबईत बैठकीचे आमंत्रण दिले आहे. दरम्यान राजू शेट्टी यांचा मुलगा सौरभ शेट्टी सध्या चर्चेत आहे.

एकनाथ शिंदेंच्या सातारा दौऱ्यावरील संकट टळले; राजू शेट्टींनी घेतली नमती भूमिका

माजी खासदार राजू शेट्टी यांचा पुत्र सौरभ शेट्टी (Saurabh Shetti) याला नुकतीच पोलिसांनी अटक केली आहे. सौरभ शेट्टी हा मागील काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तरुणांसाठी आंदोलन करत आहे. सध्या कोल्हापूर येथील डिकेटीई ही संस्थेत विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी घोषणाबाजी करत असताना सौरभ शेट्टी याला अटक करण्यात आली आहे.

शरद पवारांना मोठा धक्का! ‘या’ जवळच्या नेत्याने सोडला पक्ष

डिकेटीई ( DKTE Kolhapur) ही संस्था स्वायत्त संस्था (Autonomous Collage) असून येथे विद्यापीठामार्फत परीक्षा न होता महाविद्यालयाकडूनच परीक्षा घेतल्या जातात. यामध्ये जे विद्यार्थी नापास होतात त्यांना वर्षातून तीन वेळा परिक्षा देण्याची परवानगी आहे. परंतु, महाविद्यालयाकडून त्या घेतल्या जात नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाते.

आमदार शहाजीबापू यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिहिणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार

यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तरुणांनी महाविद्यालय परिसरात सलग दोन दिवस आंदोलन केले. यावेळी विद्यार्थी आक्रमक झाल्याने सौरभ शेट्टी याला व संघटनेतील तरुणांना गाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जिद्दीने आर्मीची वर्दी मिळवणारी तरुणी शेवटी नशीबासमोर हारली; 10 महिन्यांच्या संघर्षानंतर प्राणज्योत मालवली

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *