
हिंदी सिनेसृष्टीतील ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे राखी सावंत (Rakhi Sawant) होय. राखीने अभिनयाच्या जोरावर प्रचंड मोठा चाहतावर्ग कमावला आहे. राखी सावंत सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. राखी तिचे व्हिडिओ (video) आणि फोटो (Photo by Rakhi Sawant) पोस्ट करत चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करते. सध्या राखी सावंत वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
अहमदनगरचे सुद्धा लवकरच नामांतर होणार? गोपीचंद पडळकर यांनी केली मागणी
राखीने तिच्या पती विरोधात तक्रार दाखल केली आहे. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आदिल खानला अटक केली आहे. त्यामुळे सध्या राखी चर्चेत आहे. सध्या राखीचे सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राखी सावंत दुबईला रवाना झाली असल्याचे दिसत आहेत. राखी मुंबई विमानतळावर दिसली. तसचे तिने नव्या इनिंगची माहिती चाहत्यांना दिली आहे.
शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राखी म्हणते की, मी आता विमानतळावर आहे. इथून मी दुबईला जाणार आहे. तुम्ही उत्सुक आहात ना? माझी अॅकॅडमी सुरू होत आहे. तसेच यावेळी तिने लवकरात लवकर अॅकॅडमीत प्रवेश घ्या अशी विनंती देखील केली आहे. राखीच्या या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊसच पडला आहे.
अनेकांनी राखीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच काहीजण तिला ट्रोल करत आहेत. एका युजरने लिहीले की, तुला भेटायला दुबईत कोण येणार! तू काय नोरा फतेही आहेस का? याचवेळी दुसऱ्या एकाने लिहीले की, यांच्याकडून अभिनय शिकण्यापेक्षा मी हे क्षेत्रच निवडणार नाही.
ऊस राहतोय का काय? या भीतीपोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची होतेय लूट