Sanjay Raut: मोठी बातमी! राऊतांच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी

Big news! Raut's bail application will be heard today

मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटक होऊन शिवसेना खासदार संजय राऊत न्यायालयीन कोठडीत आहे. बऱ्याचदा त्यांच्या कोठडीमध्ये वाढ झाली आहे. यामध्येच आता संजय राऊतांनी (Sanjay Raut) जामीनासाठी मुंबई (Mumbai) सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात अर्ज केला. आता यावर आज कोर्टात सुनावणी होणार आहे.

राज्य सरकारचा मोठा निर्णय! लम्पी रोगामुळे जनावरे गमावलेल्या शेतकऱ्यांना मिळणार 30 हजारापर्यंत नुकसानभरपाई

राऊतांनी केलेल्या जामीन अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत संजय राऊत यांच्या लीगल टीमकडून माहिती (Information) देण्यात आली आहे. पण संजय राऊतांच्या जामिनाला ईडी कडून विरोध करण्यात आलाय. त्यामुळे संजय राऊत यांना जामीन मिळणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे.

Eknath Shinde: ‘या’ कारणामुळे मी शिवसेना सोडली”; एकनाथ शिंदे यांनी केलं स्पष्ट

तुरुंगाच्या कोठडीत संजय राऊतांचा दिनक्रम देखील समोर आला होता. यामध्ये संजय राऊत तुरुंगामध्ये आपला जास्तीत जास्त वेळ अभ्यासात घालवतात. त्यांना कोणत्याही प्रकारची व्हीआयपी वागणूक देण्यात आलेली नाही. ते सध्या मुंबईमधील आर्थर रोड तुरुंगात आहेत. कैदी क्रमांक 8959 अशी राऊतांची ओळख आहे.दरम्यान, आज सुनावणी झाली तर संजय राऊत यांना दिलासा मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

Madhuri Dixit: माधुरी दीक्षितला गुलाबी साडीत पाहून चाहते थक्क! पाहा PHOTO

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *