Site icon e लोकहित | Marathi News

मोठी बातमी! दिल्लीच्या सपोर्टसाठी ऋषभ पंत मैदानात

Big news! Rishabh Pant in the field for Delhi's support

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ऋषभ (Rishabh Pant) पंतच्या गाडीचा भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये ऋषभ मोठ्या प्रमाणात गंभीर जखमी झाला होता. यानंतर त्याच्यावर जवळपास एक ते दीड महिना रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. यांनतर मागच्या काही दिवसापूर्वी त्याला रुग्णालयामधून डिचार्ज दिला आणि घरी आराम करण्यास सांगितले.

धक्कादायक! राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यांवर 30 ते 40 जणांनी तलवारीने केला हल्ला; दोनजण गंभीर जखमी

दरम्यान, सध्या ऋषभ पंत सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. त्याचं कारण असं की, दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत मंगळवारी मैदानात येणार आहे. दिल्लीच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी पंत स्टेडिअममध्ये उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळें सगळीकडे पंतच्याच चर्चा चालू आहेत.

गौतमी पाटीलचा ‘हा’ आहे आवडता क्रिकेटर; स्वतःच याबाबत केला खुलासा

गुजरातविरोधातील सामन्यात दिल्लीच्या सपोर्टसाठी ऋषभ मैदानात येणार आहे. तब्येत ठीक नसून देखील पंत संघाच्या सपोर्टसाठी येणार आहे. DDCA चे संयुक्त सचिव राजन मनचंदा यांनी एएनआयसोबत बोलताना सांगितले की, दिल्लीचे सपोर्टर त्याचे टाळ्या वाजवून अभिनंदन करतील.

भोला चित्रपटाने चार दिवसांत कमावला तब्बल ‘इतक्या’ कोटी रुपयांचा गल्ला

Spread the love
Exit mobile version