भारतीय क्रिकेट संघातील उत्कृष्ट् खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या गाडीचा ३० डिसेंबर रोजी भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये खेळाडू ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. या अपघातानंतरऋषभ पंत याच्यावर डेहरादून येथील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आता त्याला पुढील उपचारासाठी मुंबईमधील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
अजामीनपात्र वॉरंट जारी होताच संजय राऊतांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
दरम्यान बीसीसीआयने दिलेल्या अपडेटनुसार, ऋषभ पंतला पुन्हा क्रिकेट खेळण्यासाठी आठ ते नऊ महिने लागू शकतात. त्यामुळे ऋषभ पंत फक्त आयपीएलमधूनच नाही, तर एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतूमधून देखील बाहेर जाऊ शकतो.
गौतमी पाटील पुन्हा चर्चेत! भर स्टेजवर नाचताना एका मुलाला केलं किस
माहितीनुसार, ऋषभ पंतला बुधवारी मुंबईतील कोकिलाबेन या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. आता त्याचे पुढील उपचार या रुग्णालयामध्ये होणार आहेत. रुग्णालयातील डॉक्टरांनि दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआय आता ऋषभला पुढील शस्त्रक्रियेसाठी लंडनला नेण्याचा विचार करत आहे.