
मुंबई : सर्वच क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती असो मग त्यात अभिनेते, क्रिकेटर्स यांवर चाहते नेहमीच बारीक नजर ठेवतात. इतकंच नाही तर चाहते केवळ सामनाच नाही तर खेळाडू (players) कुठे जातात, काय करतात हे पाहण्यात देखील क्रिकेट (Cricket) चाहत्यांना उत्सुकता असते. दरम्यान आज इंदूरमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका (India and South Africa) यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना खेळला जाणार आहे. परंतु हा सामना खेळण्यापूर्वीच भारताचा कर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma) एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये रोहित शर्मा एका पोलिस अधिकाऱ्यासोबत उभा आहे.
यंदाच्या वर्षी गाळप हंगाम सुरु होण्याआधीच ऊसतोड मजूर कारखान्यावर दाखल, उपासमारीची आली वेळ
दरम्यान सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाल्याने लोक विविध गोष्टींबद्दल बोलू लागले आहेत. एका यूजरने लिहिले की, “पहिल्यांदा मला वाटले की त्याला अटक केले आहे. कारण या फोटोमध्ये कोणीच का हसत नाहीये? तर दुसऱ्या यूजरने लिहिले की , ‘क्षणभर मला वाटले की कोणता तरी गुन्हेगार पकडला आहे जो रोहित सारखा दिसत आहे.’आणखी एका यूजरने लिहिले की, ‘जर रोहित असा संथ खेळत असेल तर तुम्ही त्याला अटक करा.
Abdu Rojik: काय सांगता! अब्दु रोजिक आहे ‘एवढ्या’ संपत्तीचा मालक; वाचा सविस्तर
Best of luck. Ek century ban ta hein. @ImRo45 pic.twitter.com/SDsZMF1fY0
— Ponjit Dowarah (@ponjitdowarah) October 1, 2022
खरतर आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 सामना खेळण्यासाठी रोहित शर्मा गुवाहाटीला गेला होता. दरम्यान यावेळी आसामचे पोलिस उपायुक्त पोनजीत डोवराह यांनी रोहित शर्मा सोबत फोटो काढला आणि ट्विटर हँडलवर पोस्ट केला. तसेच या फोटोला त्यांनी कॅप्शन देताना लिहिले की, शुभेच्छा, एक शतक झाले पाहिजे. हा फोटो पाहून लोक फालतू बोलू लागले. काही यूजर्सना वाटले की रोहित शर्माला अटक करण्यात आली आहे.
Suraj Pawar: सैराट फेम प्रिन्स पून्हा चर्चेत; फसवणूक प्रकरणावर केलीली फेसबुक पोस्ट व्हायरल