
नोव्हेंबर 2019 मधला ‘तो’ पहाटेचा शपथविधी! त्या शपथविधीने राजकीय वर्तुळात उडालेली खळबळ. त्यानंतर भाजपला बसलेला धक्का आणि महाराष्ट्रात स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार अवघा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. दरम्यान ‘तो’ पहाटेचा शपथविधी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
बिग ब्रेकिंग! कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी शरद पवार उतरणार मैदानात
तो शपथविधी शरद पवारांसोबत चर्चा करूनच झाला होता, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखती दरम्यान केले आहे. 23 नोव्हेंबर 2019 च्या सकाळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र हे सरकार अवघ्या 72 तासांत कोसळले. यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कधीच स्पष्ट वक्तव्य केले नाही. मात्र देवेंद्र फडणवीस यावर आता स्पष्ट बोलले आहेत. यांनतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान आता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
ऊस वाहतूकदारांसाठी चक्काजाम आंदोलन होणार; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची घोषणा
संजय शिरसाट म्हणाले, पहाटेच्या शपथविधीची माहिती शरद पवारांप्रमाणे संजय राऊत (Sanjay Raut) यांना देखील होती असे वक्तव्य शिरसाट यांनी केले आहे. सध्या त्यांचे हे वक्तव्य खूप चर्चेत आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय शिरसाट यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.
अबब! गायीने दिला चक्क चार वासरांना जन्म; वाचा सविस्तर बातमी
पहाटेचा शपथविधी घडवून आणण्यामागे राऊतांच्या मोठा वाटा असल्याचा दावा संजय शिरसाट यांनी केलाय. त्यामुळे आता शिरसाट यांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.