मागच्या काही दिवसापूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Thackeray group MP Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले होते. या पत्रामध्ये दौंडमधील भीमा सहकारी साखर कारखान्यात ५०० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये शेतकऱ्यांची लूट झाली असून निःपक्ष चौकशीची मागणी देखील संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांकडे केली होती.
राज्यात राजकीय भूकंप? अजित पवार अस्वस्थ, कधीही काहीही होऊ शकतं; शिंदे गटातील मंत्र्यांच मोठं वक्तव्य
यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून खासदार संजय राऊत यांना कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी, त्यांनी सीबीआयकडे तक्रार करण्याचे म्हटले होते. आता याच पार्शवभूमीवर संजय राऊत २६ एप्रिलला दौंडमध्ये सभा घेणार आहेत.
दिल्लीत शरद पवार यांना बसणार आणखी एक मोठा धक्का
भीमा पाटस साखर कारखान्यामध्ये 500 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. त्यामुळे या सभेत राऊत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.