मोठी बातमी! सत्यजीत तांबेंचा विक्रमी मतांनी विजय

Big news! Satyajit Tambe wins with record votes

अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील (Independent candidate Shubhangi Patil) यांचा पराभव करत नाशिक पदवीधर मतदार संघातून सत्यजीत तांबे यांचा विजय झाला आहे. कॉंग्रेस कडून निलंबन झाल्यानंतर सत्यजित तांबेंचा झालेला हा विजय संपूर्ण राज्यभर चर्चेत राहिला आहे. पहिल्याच फेरीपासून आघाडीवर असलेल्या सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव केला. आणि विक्रमी मतांनी विजय मिळवला आहे.

बाबा रामदेव पुन्हा बरळले, इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माविषयी केले वादग्रस्त विधान

काँग्रेसने निलंबन केल्यानंतर सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांच्या विजयानंतर त्यांनी घडविलेल्या इतिहासची चर्चा जोरदार होऊ लागली आहे. सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून विजय मिळवल्याने थोरात आणि तांबे यांच्या इतिहासाची चर्चा आता राज्याच्या राजकारणात होऊ लागली आहे.

प्रसिद्ध युट्युबर अरमान मलिकने केले तिसरे लग्न? पहिल्या दोन पत्नी आहेत गरोदर

दरम्यान, नाशिक विभागामध्ये एकूण 338 मतदान केंद्रावर 30 जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडली होती.यानंतर काल त्याची मतमोजणी करण्यात आली. यामध्ये सत्यजीत तांबे यांना 68 हजार 999 मतं मिळाली. तर शुभांगी पाटील यांना 39 हजार 534 मतं मिळाली असून त्यांचा पराभव झाला.

मोठी बातमी! आदिल खानचं दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर; राखी ढसाढसा रडत म्हणाली…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *