मिर्झापुर (Mirzapur) ही एक प्रचंड गाजलेली वेबसिरीज आहे. या सिरीजमधील कलाकार देखील विशेष प्रसिद्ध आहेत. दरम्यान यातील एका कलाकाराचा मृत्यु झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या वेबसिरीज मध्ये गुड्डू भैय्याच्या सासऱ्याची भूमिका साकारणाऱ्या शाहनवाज प्रधान (Shahnwaj Pradhan Death) यांचे काल शुक्रवारी (ता.17) निधन झाले आहे.
चोर म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचे उत्तर; म्हणाले, “आता तरी…”
उपलब्ध माहितीनुसार प्रसिद्ध कलाकार शाहनवाज प्रधान एका कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. दरम्यान त्यांना तातडीने मुंबईमधील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शाहनवाज प्रधान हे 56 वर्षाचे होते.
ठाकरेंना अजून एक मोठा धक्का! ठाकरे गटाच्या खासदाराने दिले शिंदे गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र
शाहनवाज प्रधान हे ८०च्या दशकांतही लोकप्रिय झाले होते. त्यावेळी त्यांनी दूरदर्शनच्या ‘श्री कृष्ण’ या शोमध्ये नंदाची भूमिका साकारली होती. यानंतर ते ‘अलिफ लैला’ या मालिकेमध्येही झळकले होते. ‘द फॅमिली मॅन’, ‘रईस’, ‘खुदा हाफिज’ या सारख्या वेब सीरिज आणि चित्रपटांमध्येही काम केले होते.
बॉलिवूड आणि मालिकांसोबतच ओटीटी क्षेत्रात शाहनवाज यांनी धुमाकूळ घातला होता. त्यांच्या अचानक जाण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे असून शाहनवाज प्रधान यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहे.
“…त्याचा काही परीणाम होत नसतो”, निवडणूक आयोगाच्या निकालावर शरद पवारांची प्रतिक्रिया