Sharad Pawar । मोठी बातमी! शरद पवार गटाची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव, केली मोठी मागणी

Big news! Sharad Pawar group ran to the Central Election Commission, made a big demand

Sharad Pawar । पुणे : मागील महिन्यात अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्वात मोठी फूट पाडली. त्यांच्या या निर्णयामुळे पक्षामध्ये दोन गट पडले आहेत. शरद पवार यांचे सर्वात जवळचे आणि विश्वासू नेत्यांनी अजित पवार गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. राज्यात आता शरद पवार विरुद्ध अजित पवार (Sharad Pawar Vs Ajit Pawar) असा संघर्ष पाहायला मिळत आहे. (Latest Marathi News)

Havaman Andaj । राज्यात किती दिवस पावसाची उघडीप? हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती

नुकतीच शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने (Election Commission) एक नोटीस दिली होती. अशातच आता शरद पवार गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (Central Election Commission) एक याचिका दाखल केली आहे. अजित पवार यांनी दाखल केलेली याचिका अकाली आणि दुर्भाग्यपुर्ण असून त्यांच्या याचिकेत पक्षाच्या दोन्ही गटाचा कोणताही उल्लेख नाही, किंवा तसा पुरावादेखील त्यांच्याकडे नाही. त्यामुळे अजित पवार गटाने केलेली मागणी फेटाळण्यात यावी, असे शरद पवार गटाने याचिकेत म्हटले आहे.

धक्कादायक! शिंदे गटातील आमदाराचा अपघात, पोलीस व्हॅनची कारला जोरदार टक्कर

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विधानसभा अध्यक्षांकडे अजित पवारांसह शपथ घेतलेल्या आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्याकडे जास्त खासदारांचा आणि आमदारांचा पाठिंबा दिला असल्याने त्यांना पक्षाचे चिन्ह आणि नाव दिले होते. अजित पवार गटाकडेही जास्त आमदारांचा पाठिंबा आहे.

Ajit Pawar । भाषण सुरु असताना अजितदादा असे काय म्हणाले की, अमित शहांना हसू आवरेना

त्यामुळे आता निवडणूक आयोग शिंदे गटाप्रमाणे अजित पवार गटाला पक्षाचे चिन्ह आणि नाव मिळणार का याकडे संपूर्ण देशासह राज्याचे लक्ष लागले आहे. जर आयोगाने अजित पवार गटाला चिन्ह आणि पक्षाचे नाव दिले तर पर्यायाने शरद पवार गटाला नवीन पक्षाचे चिन्ह आणि नाव ठरवावे लागणार आहे.

Mumbai Bomb Blast । मुंबई पुन्हा दहशतवाद्यांच्या रडारवर? लोकल ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोटाची धमकी

Spread the love